चोपडा । येथील कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयात युवती सभेचे आयोजन करण्यात आले. युवतींना स्वतः आत्मनिर्भर होण्याची व आपल्यात असणार्या सुप्त गुणांना वाव मिळावा व त्यांना आपले कला गुण सादर करता यावेत म्हणून या युवती सभेची स्थापना झाली आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन योग प्रशिक्षक निना पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. योगा व आरोग्य या विषयावर युवतींना भविष्यात उद्भवणार्या शारीरिक व मानसिक त्रासावर योगाद्वारे कशी मात करता येईल यविषयी बहुमोल असे मार्दर्शन केले.
यांची होती उपस्थिती
कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ.डी.ए.सुर्यवंशी, वसंतराव पाटील, उपप्राचार्य, डॉ.ए.एल.चौधरी, डॉ.के.एन.सोनवणे, एम.बी.हांडे, विद्यार्थी विकास अधिकारी व्ही.पी.हौसे, प्रा.एम.टि.शिंदे, प्रा.टी.एस.पिंजारी व इतर मान्यवर उपस्थित होते.