अमळनेर । अमळनेर ते चोपडा या मार्गावरील नगाव – गडखांब ते देवगाव देवळी या 5 किलोमीटर अंतरातील रस्त्यावर जीर्ण झालेल्या झाडांमुळे कुठल्याही क्षणी अपघात होऊ शकतो अशी परिस्थिती निर्माण झाली असतांना याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. अमळनेर – चोपडा या राज्य मार्गावरील रस्त्यावर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असतेे. या राज्य महामार्गावरुन चोपडामार्गे यावल रावेर बुरहानपूरमार्गे मध्यप्रदेश तर धुळे शिरपुर कडून गुजरात कड़े लांब पल्ल्याची वाहनांची वर्दळ नेहमी सुरु असते. याच मार्गावर देवळी ते गडखांब या 5 किलोमीटर अंतरावरील रस्त्यावर 8 ते 10 निंबाची झाडे जीर्ण अवस्थेत झाली आहेत. सध्यस्थितीत पावसाळा सुरु झाला आहे. पावसाळा सुरू होण्याआगोदर सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष घालून जीर्ण झालेली झाडे लवकरात लवकर तोडण्यात यावी अशी मागणी प्रवाश्यांमध्ये व वाहनधारकांकडून होत आहे.
फांद्यामुळे अपघाताची शक्यता
झाडाच्या सुकलेल्या फांद्या ह्या विशाल असून त्या पूर्णतः रस्त्याच्या मधोमध येत आहेत. त्या फांद्या नेहमी मोठ्या वाहनांना अडथळा निर्माण करीत असतात वाहनांना अडथळा निर्माण करणार्या झाडाच्या फांद्या कापून टाकाव्यात अन्यथा मोठा अपघात होऊ शकतो. मागे अश्याच प्रकारचे झाड हे यावल चोपडा रस्त्यावर होते आणि त्या झाडाची फांदी पडली तेव्हा त्या अपघातात महाराष्ट्र शासन ची गाडी बालबाल वाचली होती. आणि ति फांदी ज्या कार वर पडली त्यातील एकाचा मृत्यू झाला होता.