चोपडा मेनरोडावरील अतिक्रमणावर पालिकेचा हतोडा

0

चोपडा । नगरपरिषदेच्या प्रभारी मुख्याधिकारी तथा प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांच्या उपस्थितीत शहरातील मेनरोडावर अतिक्रमण हटाव मोहीम पोलिसांच्या बंदोबस्तात राबविण्यात आली. यावेळी शिवाजी चौक, डॉ. आंबेडकर चौक, शनि मंदीर परीसर, तलाठी कार्यालय, तहसिल कार्यालय समोरील भाग, बोहरा गल्ली, आझाद चौक, आंबेडकर शाँपिंग सेंटर परीसरात अतिक्रमण काढून रस्त्यावरील रहदारीने सुटकेचा श्वास घेतला.