चोपडा । येथील पंकज विद्यालयाचे शिक्षक व किमया प्रकाशनचे प्रकाशक आर.डी. पाटील यांना मानवसेवा विकास फाऊंडेशन अमरावती यांच्या वतीने दिला जाणारा महात्मा ज्योतिबा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे. सदर पुरस्काराचे वितरण 5 फेब्रुवारी रोजी मुंबई येथील मराठी ग्रंथ संग्रहालय दादर (मुंबई ) येथे होणार आहे.
शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, धार्मिक, पत्रकारिता, अपंग कल्याण इत्यादी क्षेत्रामध्ये उत्कृष्ट व उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सदर पुरस्काराची दखल मानवसेवा विकास फाऊंडेशनने (अमरावती )घेतली आहे.
यांनी केले अभिनंदन
त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेश बोरोले, उपाध्यक्ष अविनाश राणे, सचिव अशोक कोल्हे, संचालक पंकज बोरोले, भागवत भारंबे, नारायण बोरोले, गोकुळ भोळे, यांशिवाय एम.व्ही. पाटील, व्ही.आर. पाटील, डॉ.संभाजी देसाई, भाईदर पती, रेखा पाटील, नीता पाटील यांसह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.