चोपडा येथील कमला नेहरू वसतीगृहात फळ वाटप

0

चोपडा । जळगाव येथील सातपुडा ऑटोमोबाईल्सचे प्रा. डी.डी. बच्छाव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून चोपडा सातपुडा ऑटोमोबाईल्सतर्फे शहरातील कमला नेहरू मागासवर्गीय मुलींच्या वसतीगृहात आदिवासी विद्यार्थीनींना फळ वाटप करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुण्यांच्याहस्ते विद्यार्थीनींना फळ वाटप करण्यात येऊन शैक्षणिक गरजांविषयी चर्चा करण्यात आली. यथायोग्य सहकार्याचे आश्‍वासन यावेळी देण्यात आले. यावेळी ताजपाचे युवा मोर्चा उपाध्यक्ष रावसाहेब पाटील, निलेश पाटील, गजेंद्र सोनवणे, डॉ. विक्की सनेर, दिपक पाटील, महेश शिरसाठ, अजय रावताडे, पंकज पाटील, विनोद पाटील, लक्ष्मण पाटील, भूषण मराठे, डॉ. सुधाकर पाटील आदि उपस्थित होते.