चोपडा : डिजीटल व तंत्रज्ञानाच्या आजचे युगात ग्राहकांनी स्मार्ट असणे गरजेचं आहे असे नायब तहसिलदार डॉ स्वप्निल सोनवणे यांनी राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने आज सकाळी 11 वाजता तहसिल कार्यालयात झालेल्या ग्राहक महोत्सव कार्यक्रमात अध्यक्षिय भाषणात बोलत होते. कार्यक्रमाला प्रारंभ मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन व स्वामी विवेकानंद, शारदा देवी यांचा प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आला. यावेळी मान्यवरांचे स्वागत राजेश पऊळ, महेश साळुंके, डि.एम.नेतकर, आर.एस. कांबळे, आर.के.पाटील यांनी केले.
मान्यवरांकडून उपस्थित ग्राहकांना केले मार्गदर्शन
डॉ. स्वप्निल सोनवणे पुढे म्हणाले की, मानव दैनंदिन जीवन जगत असतांना दुहेरी भुमिका बजावत असतो. एक ग्राहक म्हणून तर दुसरी प्रशासकिय व खाजगी क्षेत्रात कामगिरी बजावत असतांना ग्राहकांनी कायदेशीर बाजू समजून घेतली पाहिजे. कायद्याचे ज्ञान असल्याने आपली होणारी फसगत टळू शकतात. माहिती तंत्रज्ञानामुळे आपला देश प्रगत देशाकडे चालला आहे. त्यासाठी ग्राहकांनी स्मार्ट असणे गरजेचे असल्याचे यावेळी सांगितले तसेच ग्राहकांनी संघटीत होऊन आपल्यावर होणार्या अन्यायाविरूध्द न्याय मागण्यासाठी ठाम असले पाहिजे, असही डॉ. सोनवणे म्हणाले. यावेळी एक्सीस बँकचे मँनेजर अभिजीत भसीन यांनी डिजीटल बँकींग व कँशलेस,इन्टरनेट बँकींग यावर सविस्तर मार्गदर्शन केले तर वजनमाप निरिक्षक एस. टी .वाघ यांनी ग्राहकाची फसवणुक कशा प्रकारे होते व काय दक्षता घेतली पाहीजे यासंदर्भात सविस्तर माहीती देत असतांना अपु-या कर्मचारी व दोन तालुक्याचं कार्यक्षत्र वाहनाची सोय नसल्याने आम्हाला भरीव कामगिरी करता येत नाही याची खंत बोलून दाखवली. केदारनाथ पाटील यांनी ऑनलाईन व्यवहार करतांना काय काळजी घ्यावी, याचे मार्गदर्शन केले यावेळी ए.के.बोहरी यांनी बँक मँनेजर व कर्मचारी यांच्याकडून ग्राहकांची कशी दिशाभुल केली जात आहे याचावर प्रश्न उपस्थित केला प्रकाश दलाल, अनिल पालिवाल, नगरसेवक अशोक बाविस्कर यांनीही मनोगत व्यक्त केले.
यशस्वितेसाठी यांचे परीश्रम
या कार्यक्रमाला अभिजीत भसीन एक्सीस बँक मॅनेजर, ए.टी.वाघ वजनमाप निरिक्षक यावल, प्रकाश दलाल, अनिल पालिवाल, ए.के बोहरा, केदारनाथ पाटील, सुशिलकुमार टाटिया, प्रविण पाटील, विकास पाटील, के.एम.पाटील, अॅड.एस.डी. पाटील, सुंदरलाल सचदेव, आर.आर.महाजन आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुरवठा तपासणी अधिकारी राजेश पऊळ यांनी केली. सुत्रसंचालन आर.डी. पाटील यानी केले तर आभार नायब तहसिलदार महेश साळुंके यांनी मानले.