चोपडा । फेब्रुवारी 2017 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता 12 वी च्या परीक्षेत चोपडा येथील पंकज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा विज्ञान शाखेचा निकाल 100 टक्के लागला असून निकालाची परंपरा यावर्षीही कायम राहिली. कला विभागाचा 85.24 टक्के लागलेला आहे. * विज्ञान शाखेत मयुरेश रतन माने 85.23 टक्के प्रथम, कल्याणी विकास पाटील 78.30 टक्के द्वितीय तर तृतीय जयश्री सुनील पवार 77.53 टक्के असे आले आहे तर भुषण भरत पाटील 76 टक्के, हर्षल महेंद्र जैस्वाल 75.69 टक्के * कला शाखेत प्रथम तीन आलेले विद्यार्थी याप्रमाणे सविता गोरख धनगर 81.38 टक्के प्रथम, वैशाली सुक्राम कोळी
80.92 टक्के द्वितीय, जागृती सोपान पाटील 76.30 टक्के तृतीय याप्रमाणे आले आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थाध्यक्ष डॉ. सुरेश पंडित बोरोले, उपाध्यक्ष अविनाश राणे, संचालक पंकज बोरोले, संचालक नारायणदादा बोरोले, संचालक भागवत भारंबे, सचिव अशोकदादा कोल्हे, प्राचार्य
डॉ. संभाजी देसाई, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक एम. व्ही. पाटील, प्राचार्य बाईधर पती, पंकज बालसंस्कार विभाग प्रमुख रेखा पाटील, मुख्याध्यापक व्ही. आर. पाटील तसेच सर्व शिक्षक वृंद आणि कर्मचारीवृंद यांनी अभिनंदन केले.