चोपडा – जळगाव येथे आराध्य प्रतिष्ठानतर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय ए.व्ही. अबॅकसच्या स्पर्धेत राजदित्य भगवान नायदे इयत्ता सातवी हा पहिल्या टप्प्यात १०० पैकी १०० गुण मिळवुन राज्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला. चोपडा येथील संचित बडगुजर,दिग्नेश पाटील, सृजन गाडे, भुमिका पाटील, यज्ञेश लांडगे, ओम पाटील या विद्यार्थींनी देखील नेत्रदिपक यश संपादन करुन आपल्या शिरपेचात यशाचा तुरा रोवला. सदर स्पर्धेसाठी बुलढाणा, औरंगाबाद, नाशिक, मुंबई, पुणे येथील विद्यार्थींनी सहभाग घेतला होता •वरील विद्यार्थ्यांना ए.व्ही. अबॅकसच्या संचालिका स्नेहा गडे, सचिन गडे, नंदकिशोर देशमुख सह शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले तर त्यांच्या या यशाबद्दल विद्यालय व पालकांकडुन अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.