चोपडा । येथील विवेकानंद विद्यालयातील सर्व विभागात 1 जुलै ते 7 जुलै 2017 रोजी होणार्या महाराष्ट्र शासनाचा 4 कोटी भव्य वृक्ष लागवड सप्ताहात मोठ्या उत्साहात सहभागी होत ’एकचं लक्ष 4 कोटी वृक्ष‘ ही संकल्पना पूर्ण करण्याच्या हेतुने वृक्षारोपण समारंभ संपन्न करण्यात आला . कार्यक्रमाची सुरुवात शालेय परिपाठाने करत वृक्ष व श्री सरस्वती देवीच्या प्रतिमेचे पूजन केले. वृक्षावर आधारीत गीत गायली, वृक्ष जपण्यासंदर्भात प्रतिज्ञा म्हणून घेतली, घोषणा दिल्या, वृक्षाचे महत्व सांगीतले. नंतर विद्यालयाचे मुख्याध्यापक नरेंद्र भावे, रंजना दंडगव्हाळ, जेनिफर मथायस यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी सर्व शिक्षकवृंद, पहिली ते दहावीचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते. याव अभियांतर्गत प्रत्येक वर्गाने एक वृक्ष लावण्यात आले. वृक्षावर आधारीत नेमप्लेट व फलक लेखन कलाशिक्षक राकेश विसपुते यांनी केले.