चोपडा येथील विवेकानंद विद्यालयात पालक सभा

0

चोपडा । येथील विवेकानंद विद्यालयात इ.1ली ते 4थी च्या विद्यार्थ्यांच्या पालकांची पालक सभा आयोजित करण्यात आली. यावेळी विविध विषयांवर संजय सोनवणे यांनी मार्गदर्शन केले.

मुख्याध्यापिका रंजना दंडगव्हाळ यांनी पालकांशी संवाद साधला. कार्यक्रमाला डॉ.विनीत हरताळकर, डॉ. नीता हरताळकर, एम.सी.पाटील, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नरेंद्र भावे, बालवाडी विभागाच्या प्रमुख ज्योती अडावदकर सह सर्व पालक बंधू भगिनी, शिक्षकवृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कल्पना सोनवणे यांनी केले.