चोपडा : येथील विवेकानंद विवेकानंद इंग्लिश मेडिअम स्कूलमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे नर्सरी ते 6 वी च्या विद्यार्थाची कबड्डी, 100 मीटर रिले, क्रिकेट, सॅग रेस, लंगडी, बकेट बॉल.इ विविध खेळांच्या आंतरवर्गीय क्रीडा स्पर्धाना सुरुवात झाली. स्पर्धचे उद्घाटन संस्थेचे उपाध्यक्ष घनश्याम अग्रवाल यांचा शुभहस्ते माता सरस्वती देवीच्या प्रतिमेचे पूजन करून व श्रीफळ फोडून करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे सचिव डॉ. विजय पोतदार, सहसचिव अॅड. रविंद्र जैन, पालक प्रतिनिधी चोपडा पोलिस स्टेशनचे -.झ.ख. दत्तात्रय योगराज निकम, देना बँक मॅनेजर कमलेश मधुकर जाधव, डॉ. नरेंद्र मनोहर अग्रवाल सर्व विभागाचे मुख्याध्यापक उपस्थित होते. क्रीडा स्पर्धचे प्रास्ताविक मनोज पाटील यांनी केले तर खेळाडून कडून खेळाची प्रतिज्ञा कल्पेश सांळुखे यांनी म्हणून घेतली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन वैशाली गुजराथी, पुष्पा बडगुजर तर आभार स्मिता वाघेला यांनी केले, तर स्पर्धा यशस्वितेसाठी विद्यालयातील क्रीडा शिक्षक अनिल जी शिंपी, नरेंद्र महाजन यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक, विद्यार्थी, पालक उपस्थित होते.