चोपडा । येथील पंकज विद्यालयाचे शिक्षक व किमया प्रकाशनचे प्रकाशक आर.डी. पाटील हे महाराष्ट्र दिनी श्री साई प्रतिष्ठान पुणे यांचातर्फे दिला जाणारा महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 1 मे रोजी मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स स्वारगेट पुणे या सभागृहात कार्यक्रमाचे अध्यक्ष रामदास फुटाणे (वात्रटिकाकार चित्रपट निर्माते व दिग्दर्शक ) यांचा हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला सदर पुरस्कार वितरण प्रसंगी प्रा.मिलिंद जोशी (कार्याध्यक्ष महाराष्ट्र साहित्य परिषद), आमदार जगदीश मुळीक, प्रमोद आडकर (कार्यवाह महाराष्ट्र साहित्य परिषद) यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार देण्यात आला.
यांची होती उपस्थिती
शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, पत्रकारिता, अपंग कल्याण इत्यादी क्षेत्रामध्ये उत्कृष्ठ व उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सदर पुरस्काराची दखल श्री साई प्रतिष्ठान पुणे यांनी घेतली आहे. पुरस्काराबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुरेश बोरोले, अविनाश राणे, अशोक कोल्हे, संचालक पंकज बोरोले भागवत भारंबे, नारायण बोरोले, गोकुळ भोळे याशिवाय एम.व्ही. पाटील, व्ही.आर.पाटील, डॉ. संभाजी देसाई, भाईदर पती, रेखा पाटील, नीता पाटील यांसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, मित्र मंडळी व नातेवाईकानी त्यांचे अभिनंदन केले आहे.