जळगाव । धरणगाव तालुक्यातील चामगाव येथील रहिवासी व विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक शिवाजी गणपत सावंत (52) हे ट्राला व दुचाकी अपघातात जागीच ठार झाले. तर बाभूळगाव येथील रहिवासी व उखवाडी विकासोचे सचिव शालिग्राम वामन भालेराव (56) हे अपघाता जखमी झाले आहे. हा अपघात चोपडा-धरणगाव रस्त्यावरील नीमगव्हाणजवळ झाला.
चोपड्याकडून धरणगावकडे जाणार्या दुचाकी क्रमांक एमएच 19-एके 1625 ला समोरून येणार्या ट्राला क्रमांक जी. टी. 13 -एटी. 5213 ने जोरदार धडक दिली. यात दुचाकीवरील सावंत जागीच ठार झाले. तर भालेराव हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी जळगाव जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला ट्राला चालक अरुण मावजीभाई पटेल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.