चोपडा येथे अस्थिरोग शिबिरात तीनशे रुग्णांची झाली तपासणी

0

चोपडा । येथील भारतीय जैन संघटना व पुणे येथील संचेती हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने अस्थिरोग शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबीराला रुग्णानी उस्फुर्त प्रतिसाद दिला. शिबिरात 300 रुग्णानी तपासणी करून घेतली. भारतीय जैन संघटना व संचेती हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने शिबीर शहरातील उपजिल्हा रुग्णालयात घेण्यात आले होते. संचेती हॉस्पिटलचे डॉ.हिमांशू कुलकर्णी, डॉ.शंतनु गुज्जला, डॉ.मेघराज होलांबे, डॉ.सागर दवे यांनी रुग्णाची तपासणी केली तर डॉ.गायत्री व डॉ.अनुशा यांनी रुग्णाना व्यायाम धडे देत महत्व पटवून दिले. डॉ.हषल संचेती, रोहन पानपाटील, सुनील गुजराथी तसेच उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ.मनोज पाटील, डॉ.पंकज पाटील, डॉ.सलगर यांचे सहकार्य लाभले. शिबीर यशस्वीतेसाठी भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष आदेश बरडिया, उपाध्यक्ष क्षितिज चोरडिया, सचिव आनंद आचलिया , कोष्याध्यक्ष निर्मल बोरा , विभागीय सदश्य लतीश जैन , जेष्ठ सदस्य धीरेंद्र जैन , दीपक राखेचा, शांतीलाल कोचर, प्रवीण राखेचा, जितेंद्र बोथरा , दिनेश लोडाया, राजेंद्र टाटिया मनीष टाटिया, निलेश बरडिया आदींनी परिश्रम घेतले.