चोपडा येथे क्रॉसकंट्री स्पर्धा उत्साहात

0

चोपडा प्रतिनिधी । येथील पंकज कला महाविद्यालय व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विदयापीठ, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने एरंडोल विभागीय क्रॉस कंट्री स्पर्धा पार पडली.

पुरूषांच्या स्पर्धेचे उदघाटन पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संचालक पंकज बोरोले व संस्थेचे उपाध्यक्ष अविनाश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे संचालक भागवत भारंबे, नारायण बोरोले, मुख्याध्यापक एम.व्ही. पाटील, माध्यमिकचे मुख्याध्यापक व्ही. आर. पाटील, प्राचार्य मिलींद पाटील, निता पाटील, प्राचार्य डॉ.संभाजी देसाई उपस्थित होते.

या स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे
पुरूष गट :- पहिला क्रमांक -विशाल धनगर, चोपडा. दुसरा क्रमांक – चंद्रकांत पाटील, भडगाव.तिसरा क्रमांक – अमोल पाटील, अमळनेर. चौथा क्रमांक – रवींद्र पावरा, चाळीसगाव. पाचवा क्रमांक – लहु भिल्ल, भडगाव. सहावा क्रमांक – राहुल पाटील, भडगाव.
महिला गट :- पहीला क्रमांक – पुजा पाटील, एरंडोल. दुसरा क्रमांक – भारती पाटील, अमळनेर. तिसरा क्रमांक – ममता पाटील, चोपडा. चौथा क्रमांक – पुनम राठोड, भडगाव. पाचवा क्रमांक – छम्मी बारेला, चोपडा. सहावा क्रमांक – पुनम पाटील, भडगाव.