चोपडा । पुणे येथील नेवे वाणी समाज मंडळाचे 11वे स्नेह संमेलन अर्थात एकादश महोत्सव रविवारी 7 मे रोजी भोसरी (पुणे) येथील अंकुशराव लांडगे नाट्यगृहात उत्साहात पार पडला. यावेळी चोपडा शेतकरी सहकारी सूतगिरणीच्या संचालिका व सामाजिक कार्यकर्त्या रंजना श्रीकांत नेवे या अध्यक्षस्थानी होत्या. याप्रसंगी ’हा खेळ सावल्यांचा’ (शॅडो अॅक्ट), राष्ट्रीय एकात्मता दर्शक कार्यक्रम विशेष आकर्षण ठरले. अभिनव व नाविन्यपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रमाच्या सादरीकरणाने कलावंतावर सुमारे लाख रूपयांचे बक्षीसांची उधळण झाली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अॅड.प्रकाश साळसिंगीकर (बदलापूर), जेष्ठ पत्रकार प्रफुल्ल नेवे (भुसावळ) व श्रीकांत नेवे (चोपडा) हे उपस्थित होते.
’जरा याद करो कुर्बानी’च्या
शॅडो अॅक्टचे आकर्षण
या कार्यक्रमातील मुख्य आकर्षण ’जरा याद करो कुर्बानी’ अर्थात भारतीय सेनेची यशोगाथा हा खेळ सावल्यांचा (शॅडो अॅक्ट) हा कार्यक्रम सुमारे सतरा मिनिटांचा विस लहान मोठ्या कलावंतांनी सादर केला. योगीता व राजेश नेवे, सागर नेवे, प्रशांत नेवे, यांची संकल्पना व निर्मिती होती. प्रौढ, जेष्ठ समाज दाम्पत्यांनी विशेष फॅशन शो मध्ये प्रांतीय व धार्मिक दर्शन घडविले. सांस्कृतिक कार्यक्रमात स्वातंत्र्यविर सावरकर यांचे ’जयोस्तुते’ या उत्कट देशभक्तीपर गित गायनासह समाजातील कलावंतांनी गीत, नृत्य, लावणी, कव्वाली व फॅन्सी ड्रेस,कविता वाचन आदी कार्यक्रम पार पडले. एका वर्षाखालील मुलींना सुकन्या समृध्दी उपहार वैजयंती नेवे यांच्या तर्फे वितरीत करण्यात आला. स्त्री शक्तीचा सन्मान देखील करण्यात आला.
विविध क्षेत्रातील प्राविण्य मिळविणार्यांचा सन्मान
यावेळी प्रा.डॉ.विजय नेवे (यवतमाळ), नेहा नेवे(अंबेजोगाई), प्रा.संजय नेवे (चोपडा), संदीप नेवे(जळगाव), स्वाती नेवे(भुसावळ), सायली नेवे(साकळी), मिहीर संजीव नेवे(पुणे), मंजू अभिजित नेवे(जळगाव), श्रुती वाणी (अहमदाबाद), पार्थ नेवे(पुणे), आदित्य नेवे(पुणे), श्रेयस नेवे(पुणे), प्रतिक्षा नेवे (बर्हाणपुर) यांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले. समाजाने एकजूटीने हेवेदावे टाळून देशपातळीवर संघटीत व्हावे.त्यामुळे समाजातील युवकांच्या प्रगतीला मार्ग मिळू शकतो.त्यांच्यातील सर्वागीण गुणांना वाव मिळण्यास मदत होईल.स्व.बापू वाणींचा व त्यांच्या कुटुंबाचा त्यागामुळे ते समाजाचे आदर्श असल्याचे प्रतिपादन अध्यक्षीय भाषणात रंजना नेवे यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्रीपाद नेवे व परिमल नेवे, योगिता नेवे यांनी केले. समाजाने एकजूटीने हेवेदावे टाळून देशपातळीवर संघटीत व्हावे.त्यामुळे समाजातील युवकांच्या प्रगतीला मार्ग मिळू शकतो.त्यांच्यातील सर्वागीण गुणांना वाव मिळण्यास मदत होईल.स्व.बापू वाणींचा व त्यांच्या कुटुंबाचा त्यागामुळे ते समाजाचे आदर्श असल्याचे प्रतिपादन अध्यक्षीय भाषणात रंजना नेवे यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्रीपाद नेवे व परिमल नेवे, योगिता नेवे यांनी केले.
स्व.बापू वाणींना ’समाज गौरव’
यावल येथील आरएसएसचे स्वंयसेवक, जनसंघाचे कार्यकर्ते 1973च्या शेतकरी मोर्चावर झालेल्या फैजपूर येथील गोळीबारांतील हुतात्मा स्व.देविदास राजाराम तथा बापू वाणी यांना ’समाज गौरव’ पुरस्कार त्यांचे बंधु अंबादास नेवे यांना श्रीकांत नेवे यांच्याहस्ते देण्यात आला. कार्यक्रमात स्व.बापू वाणी यांच्या जीवनकार्यावर आधारित संकेत अविनाश नेवे संकलित ’आठवणीतले बापू’ या पुस्तकाचे प्रकाशन कार्यक्रमाध्यक्षा रंजना नेवे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी अंबादास नेवे यांनी हृद मनोगत व्यक्त केले.