चोपडा । पवारनगर परिसराला नगराध्यक्ष मनिषाताई चौधरी, गटनेते व माजी उपनगराध्यक्ष जिवनभाऊ चौधरी यांची भेट स्थानिक महिलांनी समस्यांचा पाढा वाचला. मुलभूत सुविधा पुरविण्याचे आश्वासन दिल्याने महिला वर्गाचे झाले समाधान. रस्ते गटारींसाठी यावल रस्त्या लगत असलेल्या पवार नगर परीसरातील महिलांनी काल 13 जुलै रोजी नगरपालिकेवर मोर्चा आणून मुख्याधिकारी यांना निवेदन दिले होते.
प्रत्येक नगरातील समस्या जाणून घेतल्या
नगराध्यक्ष मनिषा चौधरी हे बाहेरगावाहुन आज सकाळी आल्यावर 11.30 वाजेच्या सुमारास पवार नगर, शंकरपार्वती नगर, राधाकृष्ण नगर यांचासह परीसरातील रस्त्यांची पाहणी नगराध्यक्ष मनिषा चौधरी शहरविकास मंचचे गटनेते जिवनभाऊ चौधरी यांनी केली. त्यांचा सोबत बांधकाम अभियंता, शिवनंदन राजपुत, रूपेश जाधव हे होते. या परिसराकडे समस्या जाणून घेण्यासाठी देखील कोण ही आले नाही परंतू आपण आमच्या समस्या ऐकले व प्रत्यक्ष पहाणी करण्यासाठी आल्याने समाधान व्यक्त केले. यावर नगराध्यक्ष मनिषाताई चौधरी व जिवनभाऊ चौधरी यांनी सांगितले की आम्हाला येऊन चार सहा महिने होत आहे. आता तात्पुरता रस्त्यावर मुरूम टाकुन देतो. पावसाळा संपल्यावर रस्ते व गटारींचे कामे टप्या टप्याने करू. तसेच मुरूम टाकणारे टेकेदार यांनाही बोलावून घेऊन मुरूम टाकण्याचे आदेश दिलेत.