चोपडा। येथील शासकीय विश्राम गृहासमोरील एलआयसी कार्यालयाच्या पार्किंगमधून एक मोटार सायकलची चोरी झाली असून याबाबत चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांकडून प्राप्त माहिती अशी की, 29 रोजी दुपारी 1.15 ते 2 च्या दरम्यान अडावद येथील दिलीप जगन्नाथ पाटील यांची मोटर सायकल क्रमांक (एमएच 19 बीटी 0273) ही 25 हजार रुपये किमतीची लाल तपकिरी रंगाचे हिरो होंडा स्प्लेेंडर मोटारसायकल चोरी झाली. याबाबत चोपडा शहर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक फौजदार दत्तात्रय पाटील हे करीत आहेत. सदर घटनेमुळे एलआयसी कार्यालयाच्या पार्किंगमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा हवा होता अशी चर्चा नागरिकांमध्ये होती.