चोपडा येथे बहुजन क्रांती मोर्चा

0

चोपडा । तालुक्यातील विविध सामाजिक संस्थांच्या वतीने विविध मागण्या मांडण्यासाठी बहुजन क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले. ‘एकच पर्व बहुजन सर्व’हा नारा देण्यात आला असून मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आला. चोपडा शहरात 8 रोजी सकाळी 11:30 वाजता विश्राम गृहापासून मोर्चाला सुरुवात झाली. सुरूवातीला मोर्चाची अध्यक्षता करणारे जामनेर येथील राजू खरे यांनी बहुजनांचा इतिहास, एकता, समस्या त्यावरील समाधान यावर प्रकाश टाकीत संबोधित केले. सदरील मोर्चा विश्राम गृह, पेट्रोल पंप, बस स्थानक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बाबासाहेब आंबेडकर चौक, मेन रोड, शनी मंदिर, घोडगावकर चौक, सराफ गल्ली, चावढी चौक मार्गे तहसील कार्यालयावर धडकून मागण्यांचे निवेदन तहसीलदार दीपक गिरासे, नायब तहसीलदार स्वप्नील सोनवणे यांना देण्यात आले.

निवेदनात या आहेत मागण्या
ईव्हीएम मशीन बंद करून पेपर बॅलेटने निवडणूक घेणे, अक्ट्रॉसिटी कायदा कडक करण्यात यावा तसेच त्याचा गैर वापर करणार्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल व्हावा, शेतकर्‍यांचे वीजबिल माफ करावे, संपूर्ण कर्ज माफ करावे, शेतमालाला हमीभाव देण्यात यावा व तो महागाई नेर्देशांकाशी जोडण्यात यावा, नवाड जमिनीवर 7/12 मध्ये नाव टाकण्यात यावे, बेरोजगारांना रोजगार भत्ता देण्यात यावा, मराठा समाजाला व धनगर समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे, महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी स्वतंत्र कायदा करण्यात यावा, ख्रिश्चन जनसमुदाय व चर्चमधील हल्ले थांबवून त्यांना कायदेशीर संरक्षण देण्यात यावे, लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्माची मान्यता देण्यात यावी, वक्फ बोर्डाच्या जमिनीवरील बेकायदा अतिक्रमणे हटविण्यात यावे, पुणे येथील आंबेडकर जयंतीवर दगडफेक करणार्‍यांवर कडक कारवाई करण्यात यावी, ओबीसीची जातीनिहाय जनगणना करण्यात यावी, सर्व समूहातील कष्टकरी व शेत मजुरांना हक्काची शेतजमीन देण्यात यावी, देशातील नैसर्गिक साधन संपत्तीची व बड्या उद्योग धंद्यांचे प प्रकल्पांचे राष्ट्रीय करणं करण्यात यावे, आदिवासींना वन जमिनी देण्यात यावे, महात्मा जोतिबा फुले यांना भारत रत्न देण्यात यावे, या व अशा अनेक मागण्या असलेले निवेदन यावेळी तहसीलदार चोपडा यांना देण्यात आले.

मोर्चात यांचा होता सहभाग
या मोर्चाचे अध्यक्षता राजू खरे, अरुण शिंदे, विनोद तडवी, जियाउद्दीन काझी, हाजी असदअली सैयद, विजय शंभरकर, जितेंद्र साळुंखे, सुलेमान तडवी, मेहेरबान तडवी, अय्युब तडवी, माजी सभापती गोपाळ सोनवणे, रमेश ठाकूर, रमेश माळी, जितेंद्र भिल, विकास बारेला, शुभम साळुंखे, जितेंद्र साळुंखे, संजय कोळी, संजय शिरसाठ, हरचंद धनगर, अक्रम अली, फिरोज पटेल, फारुख शेख, नेहान अहमद, मतीन पटेल, सकलेन खाटीक, रिजवान पटेल यांच्यासह ओबीसी, एससी, एसटी, एनटी, व्हीजेएनटी, एसबीसी, एमबीएस व अल्पसंख्यांक समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.