चोपडा येथे मावळत्या पंचायत समिती सदस्यांना निरोप

0

चोपडा । जि.प. व पं.स. निवडणूक नुकतेच झाले असून 14 मार्च रोजी नवनिर्वाचित सभापती, उपसभापती यांची निवडणुकीचा पार्श्वभूमीवर मावळते पं.स. सदस्य यांची सभागृहात मिटींग घेण्यात आली. गेल्या पंचायत समिती निवडणूकीमध्ये चोपडा पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता होती त्यांनी पाच वर्षीचा कार्यकाळात ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या अथवा तक्रारी येऊ दिले नाहीत पाच वर्षे विविध विकास कामासाठी निधी प्राप्त करून ग्रामीण भागात खर्‍याअर्थाने विकास करण्याची संधी जनतेचा माध्यमातून मिळाली होती त्या अनुषंगाने गरीब कुटुंबाना घरकुलाचा माध्यमातून न्याय मिळवुन देण्यासाठी सतत प्रयत्नशिल राहिल्याने समाधान वाटले आहे, असे मावळते सभापती सविता राहुल पाटील यांनी सांगितले.

शेवटची मासिक सभा शांततेत
पं.स. सदस्यांची शेवटची मासिक मिटींग घेण्यात आली होती. मिटींग आटोपल्यानंतर गट विकास अधिकारी यांचेसह कर्मचारींनी सभापती, उपसभापती व सदस्य यांना पंचाईत समितीच्या पटागंणावर निरोप देण्यात आला. यावेळी सभापती सविता पाटील,उपसभापती नदांबाई पावरा,सदस्या भारती बोरसे,सोनाली पाटील , कमलबाई शिरसाठ, सुभाबाई सोनवणे, सदस्य रामंचद्र भादले अनिल पाटील, शेख ताहेर शेख रज्जाक, माणिकचंद महाजन, ज्ञानेश्वर साळुंखे, बीडीओ ए.जे.तडवी विस्तार अधिकारी जे पी पाटील, महेद्र बोरसे, भटु पाटील, ताराचंद पावरा, राजु भाटीया आदि उपस्थित होते.