चोपडा येथे राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक

0

चोपडा प्रतिनिधी । चोपडा पीपल्स बँकेच्या सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक उत्साहात पार पडली.

यावेळी मंचावर विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, माजी आमदार दिलीप सोनवणे, युवक जिल्हाध्यक्ष ललित बागुल, कार्यध्यक्ष विलास पाटील,प्रदेश उपाध्यक्ष विजया पाटील,पीपल्स बँकेचे चेअरमन चंद्रहास गुजराथी,माजी जि.प. अध्यक्ष गोरख पाटील,चोसाका माजी चेअरमन अ‍ॅड घनश्याम पाटील,नीता पाटील,अपंग सेल जिल्हाध्यक्ष कांशीराम इंगळे,माजी प स सभापती गोकुळ पाटील,डी पी साळुंके,राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील,बाजार समिती सभापती जगन्नाथ पाटील,शेतकी संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर पाटील,चोसाक चेअरमन अतुल ठाकरे,प्रमोद पाटील,गिरीश पाटील,राष्ट्रवादी महिला अध्यक्ष भारती बोरसे,नारायण पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
आगामी काळात चोपडा विधानसभा मतदार संघात पक्षाचे स्थानिक नेते अरुण गुजराथी व पक्ष ज्याला उमेदवार देईन त्याला निवडून द्या, असे आवाहन पक्षाचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष अ‍ॅड रवींद्र पाटील यांनी केले. तर बूथ प्रमुख नेमण्यासाठी अरुण गुजराथी यांच्या हस्ते प्रत्येक गावात फार्म वाटप करण्यात आले. ते फार्म भरून आणा, त्यावर सर्व समाजाचे कार्यकर्ते घ्या,असेही अरुण गुजराथी यांनी सांगितले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील,तर आभार प्रमोद पाटील यांनी केले.