चोपडा येथे वनविभागाच्या कारवाईत सव्वा लाखाचा डिंक जप्त

0

चोपडा । येथील वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी एका बोलेरो गाडीचा पाठलाग करीत 380 किलो डिंक पकडून धडक कारवाई केली यात आरोपी बोलेरो गाडी घेऊन गेले मात्र त्यांच्या मदतीसाठी वापरलेले ट्रॅक्टर वनविभागाने ताब्यात घेतले आहे. यावेळी सदरील या कारवाई करतांना कर्जाणे वनक्षेत्रपाल संजय साळुंखे, वैजापूर वनक्षेत्रपाल एम.बी.पाटील, वनपाल ए.पी.पाटील, वनरक्षक उल्हास पाटील आर.बी.पवार, पी.के.शिंदे व वनमजूर यांच्या संयुक्त पथकाने केली. यावेळी मिळालेला डिंक 380 किलो असून त्याची बाजार भावाने किंमत 1 लाख 14 हजार एवढी आहे याबाबत कर्जाणे येथे सदर गुन्ह्यातील अज्ञात चोरट्यां विरुद्ध वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वनअधिकार्‍यांचा पाठलाग केल्याने सर्व जण झाले पसार
शुक्रवार 24 रोजी सहायक वनसंरक्षक पी.आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वैजापूर व कर्जाना येथील वनक्षेत्रपाल व कर्मचारी यांनी मिळून रात्री 9:30 वाजता चोपडा येथून बोलेरो क्र.(एम.पी.09 व्ही 7350) हीचा पाठलाग केला. त्या गाडीत डिंक असल्याची माहिती असल्याने बोरअजंटी गावाजवळ चाकुचा धाक दाखवून तेथून पसार झाले तर वैजापूरजवळ भरधाव वेगाने ते कर्जानाकडे वळले कर्जाना येथील कर्मचार्‍यांनी रस्ता अडविल्याने त्यांनी गावाबाहेरील कर्जाना आश्रम शाळेकडून अनेर नदीत गाडी टाकली. मात्र त्यात अडकल्याने त्यांची फसगत झाली. वनविभागाचे कर्माचारी पाठलाग करीतच होते. त्यांनी त्या गाडीतील आठ पोत्यांमधील डिंक जप्त केला. मात्र गाडी निघत नव्हती. त्या दरम्यान मध्यप्रदेशकडून 40 ते 50 लोकांनी येऊन ती बोलेरो नदीतून बाहेर काढून रवाना झाले.

अज्ञातांविरूद्ध वनगुन्हा दाखल
यावेळी वन कर्मचार्‍यांची संख्या अपूर्ण असल्याने त्यांनी एस आर पी बोलावली ते येण्याच्या आधी आरोपी गाडी घेऊन गेल्याने त्यांना देवझिरीलाच थांबविण्यात आले. या गाडीला काढण्यासाठी आणलेले ट्रॅक्टर ताब्यात घेण्यात आले आहे. मिळालेला डिंक 380 किलो असून त्याची बाजार भावाने किंमत 1 लाख 14 हजार एवढी आहे याबाबत कर्जाणे येथे सदर गुन्ह्यातील अज्ञात चोरट्यां विरुद्ध वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी कर्जाणे वनक्षेत्रपाल संजय साळुंखे, वैजापूर वनक्षेत्रपाल एम.बी.पाटील, वनपाल ए.पी.पाटील, वनरक्षक उल्हास पाटील आर.बी.पवार, पी.के.शिंदे यांनी कारवाई केली.