चोपडा । येथील विवेकानंद विद्यालयातील सर्व विभागातर्फे राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात इ.1 ली ते 9वीच्या विद्यार्थ्यानी ‘डोळे उघडून बघा गड्यांनो, झापड लावू नका’ या गीताने केली. थोर शास्त्रज्ञ सी.व्ही. रमन यांच्या प्रतिमेचे पूजन डॉ. निरज पोतदार, मुख्याध्यापिका रंजना दंडगव्हाळ, प्रिन्सिपल जेनिफर मथायस, अनिल शिंपी , संजय सोनवणे,सर्व विज्ञान शिक्षक यांच्याहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपशिक्षक अजय पाटील यांनी केले. डॉ. निरज पोतदार यांनी विद्यार्थ्यांना एल.सी.डि. प्रोजेक्टरद्वारे दातांचे आरोग्य व घ्यावयाची काळजी यावर अमूल्य मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात यांनी घेतले परीश्रम
उपशिक्षक कांतीलाल पाटील, उपशिशिका शितल करंदीकर, उपशिक्षिका प्रतिभा वाघ, यांच्यासह इंग्लीश मेडिअमच्या इ.1 ली ते 6 वीच्या विद्यार्थ्यांनी विज्ञान दिनावर विविध माहिती दिली. तसेच विविध विद्यार्थ्यांनी वैज्ञानिकांच्या भूमिका, भित्तिपत्रीका, विज्ञान कोडी, प्रयोग, अन्नातील भेसळ कशी होते. सहावी ब च्या मुलींनी अंधश्रद्धेवर आधारीत छानशी नाटीका सादर केली. उपशिक्षिका पूनम वैद्य यांनी विज्ञान व्याख्या स्पर्धा राबविली.तर कलाशिक्षक राकेश विसपुते यांनी इ.5वी ते 8वी च्या विद्यार्थ्यांनकडून माझी प्रयोग शाळा या विषयावर सुंदर कल्पना चित्र रेखाटून घेतली व सुंदर फलक लेखन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन उपशिक्षिका पुष्पा बडगुजर, प्रतिक्षा शिंदे, आठवीची कांचन पाटील तर आभार प्रदर्शन आठवीची हर्षदा धनगर यांनी मानले. कार्यक्रमास सर्व विभागातील विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते.