चोपडा । येथे मुंबईच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यांच्या पथकाने 38 वीज ग्राहकांना वीज चोरी केल्याप्रकरणी 16 लाखाचा दंड ठोठावला आहे.
याबाबत प्राप्त वृत्त असे की, चोपडा शहरात गेल्या सात तारखेपासून महावितरणचे मुंबई येथील अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांच्या नेतृत्वाखालील पथकात चोपडा उपविभाग उपकार्यकारी अभियंता व्ही.बी.सोनवणे, सहायक अभियंता चोपडा 1 चे समीर तडवी, चोपडा 2 चे अभियंता संदीप महाजन यांच्या समावेश होता. या पथकाने पंकज नगर, बोरोले नगर 1, 2 व 3, महालक्ष्मी नगर, गंगाई नगर, अनंत नगर, पवार नगर, चंदा-गौरी नगर, गणेश कॉलनी व शिव कॉलनी आदींसह अनेक भागात वीज चोरी करणार्यांवर कारवाई केली. यात 38 वीज ग्राहकांवर 16 लाखाच्या वर दंड ठोठावला आहे. तशा नोटिसा त्यांना पाठविल्या आहेत.