चोपडा वकील संघाच्या अध्यक्षपदी जडे बिनविरोध

0

चोपडा : चोपडा वकील संघाची 2017 साठीची कार्यकारणी घोषीत करण्यात आली असून संघाच्या अध्यक्षपदी अ‍ॅड.राजेंद्रकुमार एम. जडे यांची तर उपाध्यक्षपदी अ‍ॅड.सचिन पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

तसेच वकील संघाच्या कार्यकारीणीच्या सचिवपदी मिलींद बाविस्कर, सहसचिव अ‍ॅड.यु.के.पाटील, कोषाध्यक्षपदी अँड. भैय्या पाटील यांची निवड करण्यात आली आहे. 26 रोजी चोपडा वकील संघाची बैठक घेण्यात आली होती. यात ही निवड जाहिर करण्यात आली. यावेळी निवड झालेल्या कार्यकारणी सदस्यांच्या उपस्थितांनी पुष्पहार देवून सत्कार केला.