चोपडा । शासनाने राज्यात 4 कोटी वृक्ष लागवडीसाठी 1 ते 7 जुलै या सप्ताहात वृक्ष लागवड करण्याचा संकल्प हाती घेतला असुन जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वृक्ष रोपवण केले जात आहे. आज वन विभागातील चोपडा वन परिक्षेत्रात कंपार्ट नं. 260 या 25 हेक्टरवर जमिनीवर आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी वृक्षारोपण संदर्भात मनोगत व्यक्त करताना सांगितले की, दिवसेंदिवस भुजल पातळीवर वृक्षांची संख्या कमी होत असल्याने नागरिकांना सातत्याने ऑक्सीजन कमी प्रमाणात मिळत आहे. वृक्ष जास्त प्रमाणात जगवून त्यांचे संगोपन करणे ही काळाची गरज आहे.
उन्हाळ्यात माणसांना जसे झाडांची सावली मिळते, तशीच सावली वन्य प्रान्यांना देखील मिळत असते. वृक्ष लागवडी सोबतच आदिवासी बांधवांना मोहाची वृक्ष मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून द्यावी त्या पासुन अतिदुर्गम भागातील आदिवासींना रोजगार उपलब्ध होईल. त्यामुळे त्यांच्या हातात चार पैसे मिळतील असे वृक्षरोपण प्रसंगी वन अधिकार्यांना सुचना देवुन मागील वर्षीचा केलेले वृक्ष रोपणाचे झाडे आज 80 ते 90 टक्के जगल्यामुळे कौतूक केले.