आमदार चंद्रकांत सोनवणे यांचे प्रतिपादन
चोपडा – शहरातील भागोदय नगरजवळील हुडको मैदान येथे चोपडा क्रीडा संकुलनाचे काम लवकरच होणार आहे अशी माहिती आ.प्रा.चंद्रकांत सोनवणे यांनी चोपडा विश्रामगृह येथे दिली.
गेल्या तीन वर्षापासून आ.प्रा.चंद्रकांत सोनवणे हे चोपडा क्रीडा संकुलनासाठी प्रयत्न करीत होते आज या प्रयत्नांना यश येत मौजे चोपडा गट नं.१९+२०+२२/२ ब क्षेत्र २ हेक्टर ०९ आर अशी क्रीडा संकुलनाची जागा आज चोपडा तहसीलदार दिपक गिरासे यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांच्या कडे सुपुर्द करण्यात आली.यासाठी चोपडा नगरपालिका मुख्याधिकारी बबन तडवी तसेच नगर पालिकेचे सहकार्य लाभले.
आ.प्रा.सोनवणे म्हणाले कि शहरातील लोकांना खेळण्यासाठी क्रीडांगण उपलब्ध नव्हते आज या गोष्टीला यश आले असून डिसेंबर २०१८ मध्ये अत्याधुनिक क्रीडा संकुलनाचे भूमिपूजन करण्यात येईल त्यामुळे शहराला क्रीडा वैभव प्राप्त होईल यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कडून १ कोटी प्राप्त झाले असून अजून क्रीडा संकुलनाला भव्य दिव्य करण्यासाठी आदिवासी विभागाकडे ४ कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठवण्यात आला असून आदिवासी विभागाकडून तो केंद्राकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आले आहे.तो मंजूर होण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करीत आहे.
यावेळी चोपडा तालुका प्रभारी क्रीडाअधिकारी अरविंद खांडेकर,चोपडा विधान सभा संपर्कप्रमुख सुधीर गडकरी,तालुका प्रमुख राजेंद्र पाटील,शहर प्रमुख आबा देशमुख नरेश महाजन,प.स.उपसभापती एम.व्ही.पाटील,सदस्य भरत बाविस्कर,नगरसेवक किशोर चौधरी,प्रकाश राजपूत,सुकलाल कोळी,जगदीश मराठे,नंदु गवळी,दिपक माळी आदी उपस्थित होते.