चोपडा शहरातील बंद घरातून तीन लाखाचे सोने लंपास

0

चोपडा । येथील शहरातील जुना शिरपूर रोडवरील शिव कॉलनीतील घर बंद असल्याचा फायदा घेत कुलूप तोडून कपाटातील तीन लाख रुपये किंमतीचे सोने अज्ञात चोरटयांनी लंपास केल्याची घटना घडली. शिव कॉलनीतील रहिवाशी प्रितेश प्रफुल्लचंद जैन (वय 39) हे कुटुंबासह कामानिमित्त महिन्याभरापासून बाहेरगावी होते.

याकाळात 1 जून ते 2 ऑगस्ट दरम्यान जैन यांच्या मालकीचे राहते घर बंद असल्याने संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यानी चोरी केली. शेजार्‍यांनी भ्रमणध्वनी वरून कळविल्याने जैन कुटुंबीय घरी परतले असता त्यांना चोरी झाल्याचे निदर्शनास आले. या संदर्भात प्रितेश प्रफुल्लचंद जैन यांच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुरनं.90/2017 अन्वये भादवी 454 ,457, 380 नुसार धाडसी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित ठाकरे करीत आहेत.