चोपडा । दत्त जयंती निमित्ताने हिंदू जनजागृती समितीतर्फे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नामाने नामदिंडी काढण्यात आली. नामदिंडीला शहराच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरूवात करण्यात आला. प्रारंभी धर्म शिक्षण वर्गातील धर्माभिमानी आबाजी राजपूत यांच्याहस्ते धर्मध्वज पुजन करण्यात आले. त्यानंतर शहरातील मेन रोड, गोलमंदिर, राणी लक्ष्मीबाई, गांधीचौक मार्गे अमर संस्था जवळील जुने दत्त मंदिर येथे सांगता करण्यात आली. यावेळी डॉ.भरत पाटील, सनातन संस्थेचे अशोक पाटील, हिंदू जनजागृती समितीचे सुधाकर राजपूत, भालचंद्र राजपूत, राजू दुसाणे, अलकारी गल्लीतील भाविक यावेळी उपस्थित होते.