चोपडा। येथील भारतीय जनता युवा मोर्चाची कार्यकारणी भाजप शहराध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी घोषीत केली. यावेळी नुतन भाजयुमो अध्यक्ष तुषार पाठक व कार्यकारणी सदस्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यकारणीत सरचिटणीस दिपक सावंत, भुषण महाजन, उपाध्यक्ष सुरेश चौधरी, यश शर्मा, गोपाळ पाटील, दिनेश चौधरी, चिटणीस किशोर मराठे, राहूल बडगुजर, विजय पाटील, देवानंद लोहार, कोषाध्यक्ष प्रतिक अहिरे यांचा समावेश आहे. या सत्कार प्रसंगी सूतगिरणी संचालिका रंजना नेवे, अनिल पालिवाल,गुलाब कुरेशी,रवींद्र मराठे,आर.के.शेख,मनोहर बडगुजर,आदी पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते.