चोपडा सहकारी सूतगिरणीच्या सूताचे परदेशगमन

0

चोपडा। येथील चोपडा तालुका शेतकरी सहकारी सूतगिरणीने उत्पादित केलेल्या दर्जेदार सूताच्या रिळांचा पहिला कंटेनर चीनला रवाना होत असतांना या कंटेनरचे पूजन सूतगिरणीच्या कार्यस्थळावर चेअरमन माजी आमदार कैलास पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. याबाबत अधिक माहिती अशी की, चोपडा सूतगिरणीने मार्च मध्ये प्रत्यक्ष उत्पादनाला प्रारंभ केल्यानंतर बाजारात जाणारे उत्पादन मे महिन्यात प्रथमच गेले होते. परंतु सूताचा दर्जेदार धागा पाहून दलालांच्या मार्फत या उत्पादनाला परदेशात चीनमध्ये मागणी आल्याने सुमारे अडीचशे बॅाक्सचे वीस टन वजनाचे सूत कंटेनरमध्ये चढवून रवाना करण्यात आले आहे.अजूनही एक कंटेनर उद्या रवाना होणार आहे.

यांची होती उपस्थिती
या पहिल्या कंटेनरच्या पुजनाचे प्रसंगी व्हा.चेअरमन पी.बी.पाटील, संचालक भागवत पाटील, भाऊसाहेब पाटील, शशीकांत पाटील, के.डी.चौधरी, माधवराव पाटील, राजेंद्र पाटील, रामदास चौधरी, रंजना नेवे, डिगंबर पाटील, तुकाराम पाटील, माजी संचालक श्रीकांत नेवे, कार्यकारी संचालक मांतेश महाजन, सूतगिरणीचे अधिकारी विजय पाटील, जगदीश पाटील, सुनिल भावसार, सुकुमार काळे, राहुल पाटील, सुहास शिंगे व कर्मचारी उपस्थित होते.