चोपडा । येथील चोपडा तालुका शेतकरी सहकारी सूतगिरणीचा प्रकल्प सुरू झाल्यानंतर सुताचा पहिला धागा तयार करण्यात आला. सुत गिरणी सुरु झाल्यानंतर तयार झालेला हा पहिलाच धागा आहे. हा धागा मालेगाव येथील रा.का.ट्रेडर्स यांना विकण्यात आला आहे. सुती धाग्याची पहिली गाडी भरुन विक्रीस नेण्यात आली आहे. धागा विक्रीस संचालकांच्या हस्ते संध्याकाळी सूतगिरणी निर्मिती कारखान्यावर शुंभारंभ करण्यात आला. 184 रुपये प्रति किलो भावाप्रमाणेही आठ टनाची गाडी भरण्यात आल्याची माहिती यावेळी कार्यकारी सचालक मांतेश महाजन यांनी दिली.
या पहिल्या गाडीचे पुजन संचालिका रंजना व श्रीकांत नेवे, संचालिका जागृती व संजय बोरसे यांच्या हस्ते करण्यात आले. सूतगिरणीचा उत्पादित पहिला माल विक्री झाल्याने तालुक्याचा विकासाकडे वाटचाल होणार असल्याची भावना शेतकरी सभासदांतुन व्यक्त होत आहे. यावेळी संचालक शशिकांत पाटील,राजेंद्र पाटील, रामदास चौधरी, रंजना नेवे, अशोक पाटील, जागृती बोरसे, कार्यकारी संचालक मांतेश महाजन, उत्पादन अधिकारी विजय पाटील, जगदीश पाटील, सुहास हिंगे, सतीश जाधव, माजी संचालक श्रीकांत नेवे, संजय बोरसे, सुनील बडगुजर, सुनील पाटील आदी हजर होते.