चोपडा । शहर व तालुक्यातील समस्यांना सातत्याने वाचा फोडणारे पत्रकार, संपादक आणि भारतीय पत्रकार महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने 6 जानेवारी पत्रकार दिनी येथील विश्रामगृहावर आयोजित कार्यक्रमात 13 कुपोषित आदिवासी बालकांना पोषण आहाराचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसिलदार दीपक गिरासे, उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे, शहर पोलीस ठाण्याचे पोनि किसनराव नजन पाटील, धरणगावचे ज्येष्ठ पत्रकार बाळकृष्ण पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रम पार पडला आहे.
यांची होती उपस्थिती
प्रारंभी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश लोमटे ज्येष्ठ पत्रकार अनिल पालीवाल, डॉ. अय्युब पिंजारी, रमेश जे पाटील, भरत एन. माळी, सचिन जैस्वाल, रावसाहेब पाटील, राजेंद्र चौधरी, संदीप पाटील, योगेश बैरागी, उमेश पाटील आदिंचे स्वागत छोटू उर्फ भगवान वाडे यांनी केले. प्रस्ताविक अनिल पालीवाल यांनी तर सुत्रसंचलन कवी रमेश जे. पाटील यांनी केले. 13 कुपोषित बालकांचा पोषण आहार-आरोेग्य सेविका छबुबाई पाटील, कविता सोनवणे, निता पाटील, लता पाटील, आशा पाटील आदिंनी तहसिलदार व मान्यवरांच्या हस्ते स्विकारला. आभार बाडे यांनी मानले.