चोपडा। येथील भाई कोतवाल रोडवरील पुरातन उभा मारोती मंदिराच्या जिर्णोद्घारानिमित्ताने, श्री महादेव पिंडीच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त तीन दिवसीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 15 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
बुधवारी 16 रोजी होमहवन तर गुरुवारी 17 रोजी पूर्णाहुती, श्री महादेव पिंडीची प्राण प्रतिष्ठा, आरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. योगेस्नेह स्वामी, देव वल्लभ स्वामी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा व कलश रोहण करण्यात येणार आहे. शहरातील मध्यवर्ती भागात असणार्या या प्राचीन मंदिराच्या जिर्णोद्धरासाठी नरेंद्र बाबुराव मोरे यांचे अनमोल सहकार्य लाभले आहे.