चोपड्यात 11 जून रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबीर

0

चोपडा : येथील चोपडा पीपल्स को.अ‍ॅाप. बॅक संचलित सार्वजनिक सेवा ट्रस्ट आणि जळगावच्या मुक्ती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दि.11 जून रोजी माजी विधानसभाध्यक्ष प्रा.अरुणभाई गुजराथी व त्यांचे जेष्ठ बंधू उद्योजक विठ्ठलदास गुजराथी यांच्या वाढदिवसानिमित्त सकाळी साडे नऊ वाजता पीपल्स बँक सभागृहात मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबीरात अस्थिरोग,मोतीबिंदू, ह्रदयरोग निदान, रक्तदाब, मधुमेह, जनरल रोग आदींची तपासणी तज्ञ डॅाक्टरांच्या हजेरीत तपासण्या करण्यात येणार आहे. याच शिबिरात अ‍ॅन्जीओग्राफी, अ‍ॅन्जीओप्लास्टी या तपासण्या मोफत करण्यात येणार आहेत. तरी या महा आरोग्य शिबिराचा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन बँकेचे चेअरमन चंद्रहास गुजराथी, व्हा.चेअरमन प्रवीण गुजराथी व संचालक मंडळाने केले आहे.