चोपडा । भिवंडी येथे 8 फेब्रुवारी रोजी अवैध वाहतुकदारांच्या मारहाणीत एस.टी.चालकाचा मृत्यू झाल्याने बसस्थानक परिसरातील दोनशे मिटरची मर्यादा पाळावी या मागणीसाठी येथील आगारातील कामगारांच्या संयुक्त कृती समितीने सुमारे एक तास बस वाहतूक बंद पाडली. यावेळी कृती समितीने निवासी नायब तहसीलदार डॉ. स्वप्नील सोनवणे व आगार प्रमुख वळवी यांना निवेदन देण्यात आले.
आगार बंदमध्ये याचा सहभाग
एस.टी.बसस्थानका जवळील 200 मिटरच्या आत अवैध वाहतुकदारांना बंदी असताना देखील चालक बायकांना मारहाणीचे प्रकार वारंवार होत असतात.ते सार्वजनिक वाहतुकीस धोकेदायक आहे.त्यामुळे भिवंडी येथील चालक प्रमोद गायकवाड यांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या आरोपींवर कठोर कारवाई करावी.या प्रकाराची नोंद पोलिस व एस.टी.प्रशासनाने घेवून बसस्थानका नजिकची अवैध वाहतूक बंद करावी.या आंदोलनात आगारातील सर्व कामगार सामील झाले होते. सुमारे एक तास आगार ठप्प झाले होते. यावेळी कामगार संघटनेचे सचिव पी.बी.बाविस्कर, इंटकचे डी.डी.चावरे, कास्ट्राईबचे जी.टी. सुर्यवंशी,कामगार सेनेचे संजय लोहार, रशिद शेख, श्याम घामोळे, रमेश अहिरे, मधुसुदन बाविस्कर, भगवान न्हायदे, जगदीश पाटील, सतिष सोनार, कुंदन बोरसे, मुकूंद भाट, प्रदीप बाविस्कर, अतुल पाटील, प्रदीप कोळी, विलास पाटील यांचा प्रमुख सहभाग होता.