चोपड्यात ठिकठिकाणी वृक्षारोपण

0

चोपडा – येथील राज्य परिवहन महामंडळाच्या आगारात आगार प्रमुख किशोर अहिरराव यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी डी.डी.चावरे,के.एस.सपकाळे,पी.यु.बाविस्कर,पंडित बाविस्कर,रमेश अहिरे,के.एन.सोनवणे,भगवान न्हायदे,चंद्रभान रायसिंग,दिपक सुर्वे,पी.डी.बाविस्कर, देवानंद पाटील, एम.के.पठार,एस.बी.बाविस्कर आदि कर्मचारी हजर होते.

अ.मु.साळुंखे प्राथमिक व कस्तुरबा माध्यमिक विद्यालयात वृक्षारोपण करतांना प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक एल एच अहिरे, शेजारी माध्यमिक चे आर डी साठे,जी.जे.शिंदे, बी..एम.पाटील, एस.एम.पाटील आदी उपस्थित होते.

महिला मंडळ माध्यमिक विद्यालयात वृक्ष संवर्धन सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी वृक्षारोपण करण्यात आले होते. तसेच वृक्ष दिंडी, प्रचार प्रसार फेरी, जनजागृतीपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात येणार आहे. वृक्षारोपण प्रसंगी मुख्याध्यापक सुनील चौधरी, पर्यवेक्षक सी बी माली, सागर विसपुते, राष्ट्रीय हरीत सेनेचे संजय सोनवणे, सुनील पाटील, अनिल महाजन, भास्कर माली, विजय पाटील, चंद्रकांत चौधरी, संगीता शिरसाठ यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.