चोपडा । येथील पालिका नाट्यगृहात किमया बहुउद्देशीय संस्था चोपडा आयोजित व नौलेज ब्रिज फाऊंडेशन अहमदनगर निर्मित शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती कार्यशाळा उत्साहात पार पडली. कार्यशाळेचे उद्घाटन व दिपप्रज्वलन पंचायत समितीचे उपसभापती एम.व्ही.पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. त्यावेळी चोपडा गटशिक्षणाधिकारी एस.सी. पवार, ग.स.सोसायटीचे माजी संचालक रमेश शिंदे, माजी शिक्षण विस्तार अधिकारी यावल मधुकरराव बाविस्कर, माजी मुख्याध्यापक व राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक टी.एम. चौधरी, राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक विश्वासराव बोरसे यांसह किमया बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा आशा तायडे, सचिव प्रतिभा पाटील उपस्थित होते.
दोन दिवशीय कार्यशाळेचा समारोप
24 व 25 जून या दोन दिवशीय कार्यशाळा सकाळी 10 ते 5 या वेळात आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेत कार्यशाळेत पंकज पाटील, मोहन चव्हाण, अहिरे मॅडम यांसह विविध शिक्षकांनी कृतियुक्त सहभाग घेऊन आनंद घेतला. सदर कार्यशाळेसाठी महाराष्ट्रातून 300 शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. किरण तायडे, प्रा.रमेश घुगे, प्रसाद घुगे, चेतन यादनिक, विवेक कोतवाल, वेदांत पाटील इत्यादींनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक आर.डी.पाटील यांनी केले तर आभार सागर तायडे यांनी मानले सूत्रसंचालन संजय जाधव यांनी केले.