चोपड्यात डॉक्टरांवर प्राणघातक हल्ला

0
हल्ल्याचा सर्वत्र निषेध ; कौटुंबिक कारणातून हल्ल्याचा संशय
चोपडा- शहरातील नर्मदा नगरातील डॉ.आनंद राजाराम पाटील यांच्यावर त्यांच्याच रुग्णालयात कौटुंबिक वादातून एकाने रात्री दहा वाजेच्या सुमारास वस्तरा मारून प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. घटनेनंतर संशयीत पसार झाला. डॉ.पाटील यांच्या छातीवर वस्तरा मारल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला. या प्रकरणी रात्री उशिरा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे नेमके कारण कळाले नसले तरी कौटुंबिक वादातून हा हल्ला झाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, गोविंद पाटील नामक इसमाने हा हल्ला केल्याचे समजते.