जळगाव। येथील पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील गट साधन केंद्रामार्फत गटातील शाळेत शिक्षण घेणा-या अपंग विद्यार्थ्यांना मोफत साहित्य साधनांचे वितरण सभापती आत्मराम माळके व उपसभापती एमव्ही पाटील यांचा हस्ते करण्यात आले. सर्व शिक्षा अभियान योजने अंतर्गत अपंग समावेशित शिक्षण उपक्रमात सन 2016-17 मध्ये जिल्हा स्तरावरील अपंग तपासणी शिबीरात अलिम्को तज्ञा मार्फत तपासणी झालेल्या विशेष गरजा असलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांना डॉक्टरांनी निश्चित केलेले अपंग प्रवर्गनिहाय प्राप्त साहित्य साधनांचे वाटप बुधवारी 23 रोजी शिक्षण विभाग आवारात सभापती उपसभापती यांचासह जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्याचा हस्ते करण्यात आले.
यावेळी आरोग्य सभापती दिलीप पाटील, झेडपी सदस्य गजेंद्र सोनवणे, हरिष पाटील, प्रभारी गटविकास अधिकारी गोस्वामी, प्रभारी गटशिक्षणाधिकारी गो.ची.ठाकरे, शिक्षण विस्तार अधिकारी सुधाकर तुषार गजरे, प्रधान मुख्यमंत्री प्रकाश पाटील यांचासह केद्र प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी अपंग समावेशित शिक्षण तज्ञ मिलिंद पाटील, प्रशांत सोनवणे, विशेष शिक्षक तुळशिराम सैदाणे, प्रांजाली पाटील, ममता पाटील, गणेश बोरसे, स्वप्निल महाजन, साधन व्यक्ती सुनिल मेश्राम, विष्णु गावित, दिपक महाले यांनी सहकार्य केले.