जळगाव स्थानिक गुन्हे शाखा व चोपडा पोलिसांची संयुक्त कारवाई
जळगाव : जळगाव स्थानिक गुन्हे शाखा व चोपडा पोलिसांची केलेल्या संयुक्त कारवाईत सोमवारी सायंकाळी दोघा आरोपींच्या ताब्यातून गावठी कट्टा व पाच जिवंत काडतुस जप्त करण्यात आले. तुषार पिताजी चव्हाण (23, रा.भोसे, ता.कर्जत, जि.अहमदनगर, हल्ली मुक्काम भेकराई , फुरसुंगी, हडपसर पुणे व संतोष अशोक माळी (21, रा. बालाजी नगर, हडपसर, पुणे) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.