चोपड्यात धनगर समाजाचे मिळालेल्या आरक्षणची अंमलबजावणी साठी एल्गार

चोपडा,( प्रतिनिधी) गेल्या अठरा दिवसापासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळी चौंडी या जामखेड येथे धनगर समाजाला मिळालेले एस टी प्रवर्गाचे आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी व लवकर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सुरेश बंडखोर व रुपनवार सह समाज बांधव आमरण उपोषणाला बसले आहेत.परंतु प्रशासनाने अद्याप पर्यंत दखल घेतली नाही. तसेच ७३ वर्षांपासून धनगर जमातीस न्याय हक्कापासुन वंचित ठेवल्याचे,शेखर बंगाळे यांना अमानुष मारहाण, न्याय प्रक्रियेतील वकीलांशी बदली त्यामुळे वेळ मागणे अश्या अनेक बाबींमुळे तालुक्यातील समाजातील आक्रोश निर्माण झाला आहे.म्हणुनच शासन व प्रशासनाचा निषेध करण्यासाठी तालुक्यातील धनगर समाजाने आंदोलन करुन धनगर समाजास न्याय मिळावे या संदर्भाचे निवेदन नायब तहसीलदार सचिन बामळे यांना देण्यात आले.यावेळी अमळनेर येथील भागवत गुरूजी,हिरामण कंखरे,यांनी मार्गदर्शन केले.याप्रसंगी आत्माराम म्हाळके, डॉ नरेंद्र शिरसाठ,आर सी भालेराव, नंदकिशोर सांगोरे, गोपाल धनगर, महेंद्र धनगर, शाम दाभोळे, भगवान नायदे, डि एस धनगर, डॉ अशोक कंखरे, योगेश कंखरे, प्रविण सावळे,नंदलाल धनगर,मधुकर कंखरे, देविदास धनगर, शरद धनगर,प्रदिप नायदे, विठ्ठल बोरसे, ज्ञानेश्वर धनगर, रमाकांत धनगर,नवल धनगर, वासुदेव धनगर, दत्तु धनगर, डॉ सुभाष शिरसाठ,लहुष नायदे,परेश धनगर, चंद्रकांत धनगर, प्रविण सुलताने,सुरेश न्हायदे, बबीता धनगर, छाया शिरसाठ सह समाज बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.