सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटिल यांच्याहस्ते भुमीपूजन
चोपडा : चोपडा येथील पशुचिकीत्सालय दवाखाना इमारतीचे बांधकाम कामाचे भुमीपुजन सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर आमदार चंद्रकांत सोनवणे, दिपकसिंग जोहरी, तहसिलदार दिपक गिरासे, पोनि किसनराव नजन पाटील, राजु बिटवा, विकास पाटील, किशोर चौधरी, महेश पवार, आबा देशमुख, राजाराम पाटील, महेंद्र धनगर, शरद पाटील, दिपक चौधरी, धरणगावचे माजी सभापती पं.स. दिपक सोनवणे, मोतिलाल पाटील, महेमुद बागवान, भरत बाविस्कर, प्रमोद पाटिल आदी उपस्थित होते. यावेळी प्रास्ताविक पशुवैद्यकीय अधिकारी संजय गुजराथी यांनी तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नगरसेवक महेंद्र धनगर यांनी केले.
बांधकाम वर्षभराच्या आत पुर्ण होण्याचे आश्वासन
याप्रसंगी ना.गुलाबराव पाटील म्हणाले, धरणगावच्या आगोदर चोपड्यात पशुचिकत्स दवाखान्याचा कामाला सुरवात झाले ही आनंदाची बाबत आहे. तालुक्यातील विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. मागील वर्षी पोलिस निवासस्थानाचा प्रश्न हाती घेतला होता. तो देखील मार्गी लागला आहे पोलिस व अधिकारी यांचा निवासस्थानाचा प्रश्न लवकर सुटणार असून या इमारतीचे काम एक वर्षाच्या आत पुर्ण होणार असल्याचे आश्वासन दिले. तर आमदार चंद्रकांत सोनवणे म्हणाले की, तालुक्यातील विकासाचे काम करीत असतांना गुलाबभाऊचे खुप मदत मिळते, त्याचा मार्गदर्शनाखाली जास्ती जास्त निधी आणता येईल, त्यासाठी प्रयत्न माझा असतो पशुचिकत्सालय दवाखान्याचा सर्व सुविधायुक्त इमारत असावी. यासाठी पाठपुरावा करून निधी मंजुर करून घेतला, या बांधकामासाठी 2 कोटी 56 लाख मंजुर झाले आहे. तर पाडळसे धरणासाठी आम्ही आंदोलन केले त्याची दखल मुख्यमंत्रीसाहेबांनी घेतली असुन त्यासाठी जास्त निधी देण्याचं जलसंपदामंत्री ना. गिरिष महाजन यांचा समक्ष सांगितले असही यावेळी बोलले.