भुसावळ/चोपडा : शहरातील बोरोले नगरातील बंद घरातून सोन्याचे मणी व मोबाईल असा 19 हजारांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लांबवला. याबाबत चोपडा शहर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
बंद घर चोरट्यांच्या पथ्थ्यावर
शेखर दिगंबर पाटील (32, रा.पंडित कॉलनी बोरोले नगर, चोपडा) हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. 30 जानेवारी ते 10 फेब्रुवारी या कालावधीत ते घराला कुलूप लावून लग्ना निमित्त ‘चहार्डी’ येथे भावाकडे गेले असल्याने घराला कुलूप असल्याची संधी चोरट्यांनी साधली. चोरट्यांनी नऊ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मणी व 10 हजार रुपये किंमतीचा मोबाईल असा एकूण 19 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल लांबवला. याबाबत शेखर पाटील यांच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक सुभाष सपकाळ करीत आहे.