चोपड्यात विवेकानंद विद्यालयातर्फे दिंडी सोहळा

0

चोपडा । येथील आषाढी एकादशीनिमित्त विवेकानंद विद्यालयाची दिंडी सोहळा प्रतिवर्षाप्रमाणे गांधी चौकातील विठ्ठल रुख्मिणी मंदिरातुन विवेकानंद विद्यालयाचे विद्यार्थ्यांच्या मोठ्या प्रमाणावर सहभागी होवुन विविध प्रकारचे पोशाख परीधान केलेले होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजय पोतदार, माजी अध्यक्ष डॉ. विकास हरताळकर, उपाध्यक्ष घनश्याम अग्रवाल, सचिव अ‍ॅड. रविंद जैन, मुख्याध्यापक नरेंद्र भावे यांच्या शुभहस्ते पालखीचे पूजन करून दिंडीस प्रारंभ झाला. ढोल, ताशे, लेझीम, अभंग गायन, संताच्या वेषभूषा, फुगडी, समाज प्रबोधन फलक, वृक्षदिंडी हे दिंडी सोहळयाचे विशेष आकर्षण ठरले.