चोपडा : येथील तालुका वाचनालय नगर वाचन मंदिराच्या सालाबादा प्रमाणे यंदाही सुवर्ण महोत्सवी शारदीय व्याख्यानमालेचा ग्रंथालय सप्ताह दि.21 ते 27 डिसेंबर दरम्यान होणार आहे.
या सुवर्ण महोत्सवी व्याख्यानमालेचा शुभारंभ बुधवार 21 डिसेंबर रोजी पत्रकार राहुल रनाळकर, मुंबई यांच्या भारतीय राजकारणातील बदलती समीकरणे या व्याख्यानाने होणार आहे. गुरूवार 22 डिसेंबर रोजी दुसरे पुष्प विनय पत्राळे, पुणे हे भगवत गीता सर्वांसाठी या विषयावर गुंफणार आहेत. शुक्रवार 23 डिसेंबर रोजी महेश अचिंतलवार औरंगाबाद हे सुख अॅानलाईन आहे या विषयावर तिसर्या व्याख्यानात बोलतील. चौथे पुष्प डॉ. विश्वास पाटील, शहादा हे आपला समाज आणि संवेदनशीलता या विषयावर शनिवार 24 डिसेंबरला संबोधून गुंफतील. रविवार 25 डिसेंबररोजी वास्तुशास्त्राचा मानवी जीवनावर प्रभाव या विषयावर डॅा.रवीराज अहिरराव, ठाणे यांचे व्याख्यान होणार आहे.
गांधी चौकात उपस्थितीचे आवाहन
सोमवार 26 डिसेंबरला रंगत संगत या विषयावर अभिजित कुलकर्णी, पुणे हे सहावे पुष्प गुंफतील. सुवर्ण महोत्सवी व्याखानमालेचा समारोप मंगळवार 27 डिसेंबरला संध्या पाठक, सांगली यांच्या सुश्राव्य किर्तनाने होणार आहे.
21 ते 27 डिसेंबर दरम्यान होत असलेल्या व्याख्यानमालेचा आनंद घेण्यासाठी रसिक श्रोत्यांनी रात्री 9 वाजता गांधी चौकात मोठ्या संख्येने उपस्थिती देण्याचे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष आशिष गुजराथी, उपाध्यक्ष व सांस्कृतिक समिती प्रमुख प्रा.एस.टी.कुलकर्णी, कार्यवाह गोविंद गुजराथी, डॅा.परेश टिल्लू व संचालक मंडळाने केले आहे.