चोपड्यात 11 बैलांची सुटका

0

चोपडा । शहरालगत दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन वाहने तसेच अकरा बैलांसह सहा लाख रूपयांचा वज चोपडा शहर पोलीसांनी जप्त केला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. पहिल्या घटनेत धरणगाव नाक्याजवळील हॅाटेल श्रीनाथ प्राईड एक ट्रक पडून एक लाख 40 हजार किंमतीचे सहा बैल तर दुसर्‍या घटनेत नागलवाडी रस्त्यावर चिंच चौकात वाहनातून एक लाख 10 हजार रुपये किंमतीचे पाच सशक्त बैल वाहनातून घेवून जात असतांना वाहनचालकांवर कारवाई केली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बैलांसह वाहन जप्त
पहिल्या घटनेत सकाळी सहा वाजता पोलीस कॅान्स्टेबल प्रवीण मांडोळे यांनी धरणगाव नाक्याजवळील हॅाटेल श्रीनाथ प्राईड समीप टाटा 407 प्रकारचे वाहन (एमएच 13 आर 0344) पकडली त्यातून एक लाख 40 हजार किंमतीचे सहा बैल व दिड लाख किंमतीचे वाहन असा दोन लाख 90 हजारांचा वज जप्त केला आहे.त्यातील आरोपी अनील राजाराम माळी (रा.हुडको कॅालनी) व गाडी मालक नईम शेख यांच्या विरूद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास ए एस आय दत्तात्रय पाटील करीत आहेत.

नागलवाडी रस्त्यावर दुसरे वाहन
तर दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास नागलवाडी रस्त्यावर चिंच चौकातून मध्यप्रदेशाकडे (जीजे 06 एटी 314) या वाहनातून एक लाख 10 हजार रुपये किंमतीचे पाच सशक्त बैल वाहून नेत असताना फिर्यादी राहुल सुकलाल महाजन यांच्या तक्रारी वरुन आरोपी चालक रमेश गंगाराम कोळी रा.घुमावल,वाहन मालक भरत हिंमत चौधरी गुरुकुल नगर, चोपडा यांच्या विरूद्ध चोपडा शहर पोलीसांनी बैलांसह दोन लाख रूपयांचे वाहन असा तीन लाख 10 हजारांचा वज जप्त केला आहे.या गुन्ह्याचा पुढील तपास ए एस आय भास्कर ठाकूर करीत आहेत. दोन्ही गुन्ह्यात परमीट नसतांना बैलांना अमानुषपणे कोंबून नेत असल्याने गैरपरवाना पशु वाहतूक कायद्याने गुन्हा दाखल करण्यात
आला आहे.