चोरटी वाळू वाहतुकप्रकरणी दोघांना जामीन

0

जळगाव। फुपनगरी फाट्याजवळ तलाठी मनोहर बाविस्कर यांनी एक डंपर व दोन ट्रॅक्टर हे चोरटी वाळु वाहतुक करतांना पडले होते. यानंतर सहा जणांविरूध्द तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना गुरूवारी अटक करून त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. यानंतर त्यांची 15 हजारांच्या जामीनावर सुटका करण्यात आली आहे.

फुपनगरी गावाच्या फाट्याजवळ 26 मेच्या पहाटे डंपर (क्रं.एमएच.19.बीएम.3113) व दोन विना क्रमांकाचे ट्रॅक्टर ने वाळुची चोरटी वाहतुक होत असतांना तलाठी मनोहर शिवराम बाविस्कर यांनी त्यांना पकडले असता त्यांच्याकडे कुठलाही परवाना मिळून आला नव्हता. यानंतर तालुका पोलिस ठाण्यात तलाठी बाविस्कर यांनी डंपर व ट्रॅक्टर जमा करून त्यांच्या फिर्यादीवरून रामा उर्फ विकास झिंगा भिल, पुंडलिक सोनवणे, सुरेश सपकाळे, किशोर नन्नवरे, शे.इकबाल शे.भिकन, कुलभुषन पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, चार जण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. तर आज गुरूवारी तालुका पोलिसांनी शेख इकबाल शेख भिकन व कुलभुषण विरभान पाटील यांना अटक केली. दोघांना न्यायाधीश चौधरी यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर त्यांचा जामीन झाला.