चोरटे मोकाट : पारोळा शहरात दुकान फोडून 27 हजारांचा सामान चोरीला

पारोळा : व्यापार्‍याच्या बंद दुकानातून चोरट्यांनी लोखंड कापण्याचे मशीनसह रोख रक्कम मिळून 26 हजार 788 रुपयांचा मुद्देमाल लांबवला. याबाबत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

बंद घरातून लांबवला मुद्देमाल
पारोळा शहरातील उंदीरखेडा रोडवर असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ असलेले श्रीपाद पॉवर टुल्स दुकान असून ते निखील राजेंद्र सोनवणे (25, रथ गल्ली, पारोळा) चालवतात. शुक्रवार, 3 जून रोजी रात्री 9 ते शनिवार, 4 जून रोजी पहाटे सहा वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दुकान फोडून दुकानातील लोखंड कापण्याचे मशिन आणि रोकड मिळून 26 हजार 788 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी निखील सोनवणे यांच्या फिर्यादीवरून पारोळा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक प्रवीण पारधी करीत आहे.