रत्नागिरी : चोरट्यांकडून पुन्हा कुवारबांव बाजारपेठ लक्ष्य करण्यात आली आहे. चोरट्यांनी कुवारबांव परिसरातील 3 दुकाने फोडली. मात्र यात किरकोळ ऐवज चोरीस गेल्याने शहर पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार देण्यात आली नसल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर शहर व नजिकच्या परिसरातील गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेले चोरीचे सत्र अद्यापही कायम असल्याचे स्पष्ट होत आहे. कधी शहरातील घरे व बाजारपेठ तर कधी शहरानजिकच्या कुवारबांव, खेडशीसारख्या परिसराला चोरटे लक्ष्य करताना दिसत आहेत.